तलासरी तालुक्यात शांततेत ७२ टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलासरी तालुक्यात शांततेत ७२ टक्के मतदान
तलासरी तालुक्यात शांततेत ७२ टक्के मतदान

तलासरी तालुक्यात शांततेत ७२ टक्के मतदान

sakal_logo
By

कासा, ता. १६ (बातमीदार) : तलासरी तालुक्यातील वसा, डोंगारी, आमगाव-अच्छाड, संभा, सावरोली-आणवीर, वडवली-सवणे, झरी, कोचाई-बोरमाळ, सूत्रकार, वरवाडा, झाई-बोरिगाव या ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी शांततेत पार पडल्या. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होऊन संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७२.३४ टक्के मतदान झाले.
रविवारी सकाळी मतदानाला सुरुवात होताच मतदारांनी मोठ्या रांगा लावल्या. दुपारी दीड वाजेपर्यंत जवळपास ५३.५१ टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदान केंद्रावरची गर्दी कमी होऊन साडेतीन वाजेपर्यंत ६६.१८ टक्के मतदान झाले.
तलासरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या एकूण ६० प्रभागसाठी ७९ मतदान केंद्रावर मतदान झाले. ११ ग्रामपंचायतीच्या ११ सरपंच व १७१ सदस्य पदांसाठी निवडणूक झाली. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी तलासरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.