संगीतकार सपन सेनगुप्ता यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगीतकार सपन सेनगुप्ता यांचे निधन
संगीतकार सपन सेनगुप्ता यांचे निधन

संगीतकार सपन सेनगुप्ता यांचे निधन

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार, चित्रपट दिग्दर्शक सपन सेनगुप्ता यांचे निधन झाले. सपन सेनगुप्ता आणि दिवंगत संगीतकार जगमोहन बक्षी यांची सपन-जगमोहन जोडी खूप प्रसिद्ध होती. त्यांनी १९६० आणि १९७० च्या दशकात अनेक सुपरहीट चित्रपटांना संगीत दिले. सपन-जगमोहन या जोडीने ६१ हिंदी चित्रपट, २० पंजाबी चित्रपट, सात बंगाली चित्रपट आणि पाच भोजपुरी चित्रपटांना संगीत दिले. याशिवाय त्यांनी अनेक टीव्ही मालिकांचे संगीतही दिले आहे. सपन-जगमोहन जोडीने मिळून ‘मैं तो हर मोड पर’ (चेतना), ‘हम हैं जहाँ’ (कॉल गर्ल), ‘ए मेरे दिल दिवान’ (लाल कोठी) सारख्या गाण्यांना संगीत दिले.