ठाण्यात पुन्हा एकदा विनयभंगाचा प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात पुन्हा एकदा विनयभंगाचा प्रकार
ठाण्यात पुन्हा एकदा विनयभंगाचा प्रकार

ठाण्यात पुन्हा एकदा विनयभंगाचा प्रकार

sakal_logo
By

ठाणे, ता. १६ (वार्ताहर) : ठाणे नगर पोलिस ठाण्यात मुलीच्या विनयभंगाच्या प्रकरणाला ४८ तास उलटत नाही, तोच तलावपाळी परिसरात एकाने १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फक्रुद्दीन काझीनुरूद्दीन शेख (वय ४४) असे आरोपीचे नाव असून नौपाडा पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तरुणीने विनयभंगाची तक्रार करताच नौपाडा पोलिसांनी रविवारी त्वरित आरोपीला बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करीत आहे.