१८ हजार नागरिकांना दिवाळी फराळ वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१८ हजार नागरिकांना दिवाळी फराळ वाटप
१८ हजार नागरिकांना दिवाळी फराळ वाटप

१८ हजार नागरिकांना दिवाळी फराळ वाटप

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : वाढत्या महागाईत दिवाळी फराळाचे साहित्यही महागल्याने गोरगरिबांना दिवाळी साजरी करणे शक्‍य होत नाही. या गोरगरीबांना मदतीचा हात म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे व माजी नगरसेविका भारती मोरे यांच्या वतीने दत्तनगर व आयरे गावातील सुमारे १८ हजार नागरिकांना दिवाळी फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. फराळाचा बाजार त्यासोबतच पणती, रांगोळी, कंदील आदी वस्तू नागरिकांना भेट स्वरूपात देण्यात आल्या आहेत. केवळ नागरिकच नाही, तर पालिकेचे सफाई कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी यांनादेखील साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. हिंदुत्वाच्या विचाराने महाराष्ट्रच नव्हे, तर अवघा देश पुढे चालला आहे. दिवाळीनिमित्त आपली डोंबिवली हिंदुत्वाचे विचार घेऊन भगवामय करण्याची तयारी सुरू असल्याचे या वेळी मोरे यांनी सांगितले.