कांदिवलीत रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदिवलीत रक्तदान शिबिर
कांदिवलीत रक्तदान शिबिर

कांदिवलीत रक्तदान शिबिर

sakal_logo
By

कांदिवली, ता. १७ (बातमीदार) ः कांदिवली पूर्व येथील वार्ड क्रमांक २५ माजी नगरसेविका माधुरी भोईर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिवसेनेचे उपविभाग प्रमुख योगेश भोईर यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले.
या वेळी ३३६ जणांनी रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. माजी नगरसेविका माधुरी भोईर यांचा १९ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. त्‍या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बोरिवली ब्लड बँकतर्फे रक्त संकलन करण्यात आले.