मोखाड्यात मतमोजणीवेळी कार्यकर्त्यांचा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोखाड्यात मतमोजणीवेळी कार्यकर्त्यांचा जल्लोष
मोखाड्यात मतमोजणीवेळी कार्यकर्त्यांचा जल्लोष

मोखाड्यात मतमोजणीवेळी कार्यकर्त्यांचा जल्लोष

sakal_logo
By

मोखाडा, ता. १७ (बातमीदार) : मोखाड्यातील २२ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला तहसीलदार कार्यालयात सकाळी १० वाजता सुरुवात झाली. तहसीलदार कार्यालयापासून सुमारे १०० मीटर अंतरावर बॅरिकेट टाकण्यात आले होते. या बॅरिकेटच्या बाहेर सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. सर्वांचे डोळे निकालाकडे लागले होते. निकाल ऐकण्यासाठी जमलेल्या जनसमुदायात प्रचंड उत्कंठा होती.
ग्रामपंचायत निवडणुकीचे, मतमोजणीनंतर जसजसे निकाल जाहीर होत होते, तसे विजयी उमेदवाराच्या, पक्षाचे कार्यकर्ते गुलाल उधळत विजयी घोषणा देत होते. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दहा पोलिस अधिकारी आणि १०८ पोलिस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.