घोलवडमध्ये परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोलवडमध्ये परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय
घोलवडमध्ये परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

घोलवडमध्ये परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

sakal_logo
By

बोर्डी, ता. १७ (बातमीदार) : घोलवड ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने दणदणीत विजय मिळवून सत्ताधारी व बहुजन विकास आघाडी पॅनेलचा धुव्वा उडवला सरपंच पदासाठी रवींद्र वसंत बुजड, तसेच पॅनेलमधील दहा सदस्य मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.
मागची पाच वर्ष ग्रामपंचायतीच्या कारभाराला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी परिवर्तन पॅनेलची स्थापना केली होती. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गावाचा विकास या ध्येयाने या पॅनेलची स्थापना करण्यात आली होती. मात्र पॅनेलच्या विरोधात सत्ताधारी पॅनेल, तसेच बहुजन विकास आघाडीने निवडणुकीत उमेदवार उभे करून आव्हान दिले होते. घोलवड गावातील ग्रामस्थांनी सत्ताधारी हटाव या जिद्दीने प्रचार करून परिवर्तन पॅनेलच्या ११ सदस्यांना दणदणीत विजय मिळवून दिल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. यात परिवर्तन पॅनेलकडून सरपंचपदी रवींद्र बुजड यांचा विजय झाला; तर सदस्यपदी कुणाल शहा, अर्चना शहा, जागृती कोलख निवेदिता बारी, रजनी कोल, मनोज बारठा, सतीश खारपडे, रुपल पटेल, राजेश राठोड आणि संगीता खोत यांचा विजय झाला आहे.
कोण आहेत बुजड?
घोलवड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर रवींद्र वसंत बुजड या आदिवासी तरुणाची निवड महत्त्वाची मानली जाते. मागच्या वीस वर्षाचा सहकार खात्यातील अनुभव ग्रामपंचायतीच्या कारभारात उपयोगी पडेल असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. रवींद्र यांनी परिसरातील सहकारी संस्था ऊर्जा अवस्थेत आणण्यासाठी काम केले. तसेच शेतकऱ्यांना अल्प दीर्घ मुदत कर्ज, तसेच शेतकऱ्यांसाठी आलेल्या सरकारी योजनांचा पाठपुरावा करून लाभ मिळवून देण्यासाठी मेहनत घेतली. तसेच ‘सकाळ’च्या तनिष्का उपक्रमातून स्थापन झालेल्या बोर्डी येथील महिलांच्या गटाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरासाठी बुजड यांचे योगदान फार मोठे होते.