‘प्रत्येक सैनिक, एक पणती’चे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘प्रत्येक सैनिक, एक पणती’चे आयोजन
‘प्रत्येक सैनिक, एक पणती’चे आयोजन

‘प्रत्येक सैनिक, एक पणती’चे आयोजन

sakal_logo
By

वसई, ता. १७ (बातमीदार) : लक्ष्य फाऊंडेशनतर्फे वसुबारस या दिवाळीच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी ठीक ७ वाजता ‘प्रत्येक सैनिक, एक पणती’ या कार्यक्रमाचे न्यू इंग्लिश स्कूल, वसई (प.) येथे आयोजन करण्यात आले आहे. देशाची सुरक्षा आणि एकात्मता मजबूत करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी आणि खुशालीसाठी या वेळी एक पणती लावून सामूहिक प्रार्थना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्यांसाठी पणत्यांची सोय संस्थेकडून करण्यात आली आहे.