शिवांशला मिळाले स्वतःच्या छायाचित्राचे टपाल तिकीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवांशला मिळाले स्वतःच्या छायाचित्राचे टपाल तिकीट
शिवांशला मिळाले स्वतःच्या छायाचित्राचे टपाल तिकीट

शिवांशला मिळाले स्वतःच्या छायाचित्राचे टपाल तिकीट

sakal_logo
By

शिवडी, ता. १७ (बातमीदार) ः शालेय नाट्यस्पर्धेत टपालाचे महत्त्‍व पत्रपेटीच्या प्रतिकृतीतून सांगणाऱ्या चिमुकल्या शिवांश गवंडे याला त्‍याच्‍या छायाचित्राचे टपाल तिकीट मिळाले आहे. त्‍याच्या नाट्य सादरीकरणाची दखल घेत ‘सकाळ’ने ‘चिमुकल्याने सांगितले टपालाचे महत्त्‍व’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. शनिवारी (ता. १५) टपाल खात्याने त्‍याला त्‍याचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट देऊन सन्मानित केले.
या वेळी उप डाकपाल अक्षता गाड, सहायक डाकपाल माया सगाठिया, डाक सहायक प्रमोद मोरे, धनंजय इंगळे, रवीशंकर घरडे, सूचन भेलोसे, शारदाश्रम विद्यामंदिर प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका दीप्ती इंदुलकर, वर्गशिक्षिका शैलजा पिसाळ उपस्थित होत्या.
शारदाश्रम विद्यामंदिरात पहिलीत शिकणाऱ्या शिवांश विशाल गवंडे याने शालेय नाट्य स्पर्धेत टपाल खात्याच्या पत्रपेटीच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून टपाल खात्याचे महत्त्व व आजच्या अत्याधुनिक जलद तंत्रज्ञानाच्या तसेच इलेक्ट्रॉनिक संदेशवहनाच्या काळातही टपाल खात्याच्या पत्रांची आपुलकी पत्रपेटीच्या माध्यमातून मांडून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या व स्पर्धेत बक्षीसही पटकावले.
शिवांश विशाल गवंडे हा विद्यार्थी भवानी शंकर पोस्ट ऑफिस दादरसमोर असलेल्या शारदाश्रम विद्यामंदिर मंदिर शाळेत शिकत असल्याने दररोज पोस्ट ऑफिसच्या पत्रपेटीला बघून या चिमुकल्याने प्रेरित होऊन हुबेहूब भवानी शंकर रोड पोस्ट ऑफिसच्या पत्रपेटीची प्रतिकृती बनवली व आपले विचार आत्मीयतेने जनसामान्‍यांपर्यंत पोहचवले व टपाल खात्याची शान अभिमानाने वाढवली. याबाबतची माहिती मिळताच येथील उपडाकपाल भवानी शंकर रोड पोस्ट ऑफिस सुचित्रा गाड यांनी या चिमुकल्या शिवांशला भेटवस्तू देऊन त्याचे कौतुक केले; तर टपाल खात्याकडून त्याला स्वतःचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट देण्यात आले आहे. शिवांश या टपाल तिकिटाचा वापर आपल्या आजी-आजोबांना पत्र व भेटवस्तू पाठवण्यासाठी करणार असल्याचे शिवांशने सांगितले.