वसईत प्रेरणा दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत प्रेरणा दिन उत्साहात
वसईत प्रेरणा दिन उत्साहात

वसईत प्रेरणा दिन उत्साहात

sakal_logo
By

वसई, ता. १७ (बातमीदार) : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन, तसेच जागतिक हात धुवा दिन वसईच्या इंग्लिश स्कूल व ज्युनिअर महाविद्यालयात साजरा करण्यात आला.
कोरोना प्रादुर्भाव असताना ऑनलाईन शिक्षण विद्यार्थी घेत होते, मात्र या व्यतिरिक्त वाचन हे महत्त्वाचे आहे. इंटरनेटच्या गराड्यात न अडकता विद्यार्थ्यांनी वाचन का करावे, त्याचे फायदे कोणते आहेत, याचे महत्त्व पटवून देण्यासाठी यावेळी विविध उपक्रम हाती घेण्यात आले. तसेच आरोग्याची काळजी विद्यार्थ्यांनी व पालकांनी घेतली पाहिजे, असे मुख्याध्यापिका शोभना वाझ यांनी सांगितले. विषाणूंचा परिणाम घातक असतो. बऱ्याचदा हाताद्वारे विषाणू शरीरात जाऊन विविध आजार बळावतात. त्यामुळे मुलांनी हात कसे धुवायचे, कोणती काळजी घेतली पाहिजे, यासाठी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका शोभना वाझ यांच्यासह शिक्षक, विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
---------------
वसई : न्यू इंग्लिश शाळेत प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.