बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाला एएसीआय मानांकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाला एएसीआय मानांकन
बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाला एएसीआय मानांकन

बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाला एएसीआय मानांकन

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : परळ येथील बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाला सुरक्षा, उपचार आणि योग्य वैद्यकीय सुविधेसाठी अमेरिकन अॅक्रिडेशन कमिशन इंटरनॅशनलकडून (एएसीआय) मान्यता मिळाली आहे. अशाप्रकारचे मानांकन मिळवणारे वाडिया हे देशातील पहिलेच रुग्णालय ठरले आहे. यानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वाडिया रुग्णालयाच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांचा सत्कार केला.
अमेरिकन अॅक्रेडिटेशन कमिशन इंटरनॅशनलने २५ ते २७ ऑगस्ट २०२२ दरम्यान बाई जेरबाई वाडिया चिल्ड्रन रुग्णालयात अमेरिकन अॅक्रिडिटेशन कमिशनचे पहिले आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण पूर्ण केले. मुलांसाठी बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल हे एएसीआय अमेरिका आंतरराष्ट्रीय मानकांशी वचनबद्ध असलेले भारतातील पहिले रुग्णालय ठरले आहे. या मान्यतेने रुग्णांना उच्च दर्जाची सेवा आणि शुश्रूषा प्रदान करण्याच्या रुग्णालयाच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
---
रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा पुरवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. वाडिया रुग्णालयात रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन असून एएसीआयद्वारे सूचित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता केली जाईल. सुरक्षा, योग्य उपचार आणि सुविधा, रुग्णांसह कुटुंबीयांची काळजी घेणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.
- डॉ. मिनी बोधनवाला, सीईओ, वाडिया रुग्णालय
----
वाडिया रुग्णालयाने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बहुविद्याशाखीय दृष्टिकोनातून उत्तम आरोग्य सेवा प्रदान केली आहे.
- धीरज खतोरे, संचालक आणि उपाध्यक्ष, एएसीआय