मोखाड्यात शिंदे गटाने उधळला गुलाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोखाड्यात शिंदे गटाने उधळला गुलाल
मोखाड्यात शिंदे गटाने उधळला गुलाल

मोखाड्यात शिंदे गटाने उधळला गुलाल

sakal_logo
By

मोखाडा, ता. १७ (बातमीदार) : मोखाड्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये एकनाथ शिंदे गटाने १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढवल्या होत्या. त्यामधील नऊ ग्रामपंचायतींवर आपले सरपंच निवडून आणले आहेत. तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व निर्माण करणारा एकनाथ शिंदे गट ठरला आहे.
मोखाड्यातील २७ पैकी २२ ग्रामपंचायतींसाठी १६ ऑक्टोबरला मतदान झाले. आज झालेल्या मतमोजणीत एकनाथ शिंदे गटाने नऊ, शिवसेना उद्धव ठाकरे गट ५, भाजप ४, राष्ट्रवादी काँग्रेस ३, तर जिजाऊ सामाजिक संघटनेने एका ग्रामपंचायतीवर आपले सरपंच निवडून आणले आहेत.
मोखाडा तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या खोडाळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या कविता पाटील ५८ मतांनी विजयी झाल्या आहेत. गेल्या ३२ वर्षांपासून शिवसेनेचा भगवा खोडाळा ग्रामपंचायतीवर फडकत आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली आहे. या ग्रामपंचायतीच्या ११ पैकी भाजपचे नऊ सदस्य विजयी झाले आहेत. त्यामुळे खोडाळा ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद जिंकून, शिवसेनेने बहुमत गमावले आहे. त्यामुळे शिवसेनेची ‘सिंह आला, पण गड गेला’ अशी अवस्था झाली आहे.

पाचही ठिकाणी सेनेचे सरपंच
तालुक्यात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने खोडाळा, वाकडपाडा, सूर्यमाळ, काष्टी- सावर्डे आणि करोळ या ग्रामपंचायती लढवल्या होत्या. या सर्व ठिकाणी पक्षाने आपले सरपंच निवडून आणले आहेत.

जिजाऊने उघडले खाते
या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला केवळ चार, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवडून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीची पीछेहाट झाली आहे; तर जिजाऊ सामाजिक संघटनेने प्रथमच ग्रामपंचायत निवडणूक लढवली. यात जिजाऊ संघटनेने आसे ग्रामपंचायतीत आपला सरपंच निवडून आणून तालुक्यात खाते उघडले आहे.

विजयी सरपंच....
१) मनोहर नवले, पोशेरा (शिवसेना शिंदे गट)
२) अनंता मोळे, आसे (जिजाऊ संघटना)
३) संजना दापट, बोटोसी (भाजप)
४) कविता पाटील, खोडाळा (ठाकरे गट)
५) हिरामण मोळे, बेरीसते (राष्ट्रवादी)
६) देविदास निसाळ, मोरांडा (भाजप)
७) मनीषा मालक, खोच (शिंदे गट)
८) लता वारे, उधळे वाकडपाडा (ठाकरे गट)
९) हिरामण पाटील, हिरवे घानवाळ (राष्ट्रवादी)
१०) सुलोचना गारे, गोमघर (राष्ट्रवादी)
११) प्रमिला वांगड, सातुर्ली (शिंदे गट)
१२) प्रमिला भागडे, कुर्लोद (भाजप)
१३) देवराम तुकाराम कडू, कारेगांव (भाजप)
१४) सुरेश धिंडे, धामण शेत कोशिम शेत (शिंदे गट)
१५) राजेंद्र बच्चू निरगुडे, दांडवळ (शिंदे गट)
१६) सुवर्णा लाखन, शिवली (शिंदे गट)
१७) बाळू घाटाळ, आडोशी (शिंदे गट)
१८) नरेंद्र येले, करोळ पाचघर (ठाकरे गट)
१९) प्रकाश भोंडवे, साखरी (शिंदे गट)
२०) कृष्णा वाघ, वाशाळा (शिंदे गट)
२१) गीता गवारी, सूर्यमाळ (ठाकरे गट)
२२) गौरी बोटे, काष्टी सावर्डे (ठाकरे गट)

तालुक्यातील पक्षीय बलाबल
शिंदे गट- ९
ठाकरे गट- ५
भाजप- ४
राष्ट्रवादी- ३
जिजाऊ- १