झापच्या सरपंचपदी एकनाथ दरोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झापच्या सरपंचपदी एकनाथ दरोडा
झापच्या सरपंचपदी एकनाथ दरोडा

झापच्या सरपंचपदी एकनाथ दरोडा

sakal_logo
By

जव्हार, ता. १७ (बातमीदार) : तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते. तालुक्यातील महत्त्वाच्या झाप ग्रामपंचायतीत एकनाथ दरोडा यांनी सरपंचपदासाठी २९० मतांचे मताधिक्य मिळवत विजयी झाले आहेत.
मागील पंचवार्षिक ग्रामपंचायत समितीमध्ये त्यांच्या पत्नी वंदना दरोडा यांनी येथे सरपंचपदाची धुरा सांभाळली होती. दरोडा यांनी बहुजन विकास आघाडी व सीपीएमकडून मदत झाली असल्याचे सांगितले.
नव्याने निवडणूक लढविणारे कासटवाडी ग्रामपंचायतीमधील कल्पेश राऊत हे देखील सेनेकडून निवडणूक लढवीत थेट जनतेतून निवडून येत सरपंचपदासाठी विराजमान झाले आहेत. झाप ग्रामपंचायतीमधील सरपंच एकनाथ दरोडा व कासटवाडीचे विजयी सरपंच कल्पेश राऊत यांनी सर्व मतदारांचे आभार मानून हा विजय माझ्या मतदारांचा आहे, असे सांगितले.