तेल कंपन्यांना सात अब्ज डॉलरचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेल कंपन्यांना सात अब्ज डॉलरचे नुकसान
तेल कंपन्यांना सात अब्ज डॉलरचे नुकसान

तेल कंपन्यांना सात अब्ज डॉलरचे नुकसान

sakal_logo
By

नवी दिल्ली, ता. १७ : नोव्हेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही प्रमाणात स्थिर राहिल्याने भारतीय तेल विपणन कंपन्यांना अंदाजे ६.५ अब्ज ते सात अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचे मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने अहवालात म्हटले आहे. सरकारकडून त्यांना अपेक्षेप्रमाणे निधी देण्यात न आल्याने चालू आर्थिक वर्षाचा कंपन्यांचा निकाल कमजोर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.

केंद्र सरकारने तेल कंपन्यांना जून २०२० ते जून २०२२ पर्यंतचे एलपीजी विक्रीतील नुकसान टाळण्यासाठी २२ हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. यामुळे कंपन्यांचे उत्पन्न आणि रोख चलनाची समस्या काही प्रमाणात सोडवण्यास मदत होईल. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांसाठी ‘सकारात्मक क्रेडिट’ दिले असले तरी त्यांच्या तोट्याच्या तुलनेत ही मदत कमीच आहे. इंडियन ऑईलला तीन ते ३.२ अब्ज डॉलर; तर बीपीसीएल आणि एचपीसीएलला १.६ ते १.९ अब्ज डॉलरच्या उत्पन्नात घट झाल्याचे मूडीजने म्हटले आहे. २२ मार्च ते ६ एप्रिल २०२२ दरम्यान इंधनाच्या किमतीत १० रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली होती; मात्र नोव्हेंबर २०२१ पासून दर मोठ्या प्रमाणात न बदलल्याचे कारण अहवालात सांगण्यात आले आहे.