वाड्यात सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेचा कौल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाड्यात सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेचा कौल
वाड्यात सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेचा कौल

वाड्यात सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेचा कौल

sakal_logo
By

वाडा, ता. १७ (बातमीदार) : तालुक्यात बहुसंख्य ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधारी विरोधात जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना पराभवाला समोरे जावे लागले आहे.
संपूर्ण तालुक्यात प्रतिष्ठेची कुडूस ग्रामपंचायतीत जिजाऊचे डॉ. गिरीश चौधरी हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले. अनेक वर्षे सत्तेत असलेल्या इरफान सुसे हे निवडून आले, मात्र पॅनेल पडल्याने त्यांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. बिलावली ग्रामपंचायतीत भाजपचे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्याविरोधात भाजपचे माजी तालुकाध्यक्ष केशव पाटील यांच्यात लढत होती. यात नंदकुमार पाटील यांच्या पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले. घोणसई ग्रामपंचायतीत माजी उपसरपंच दिलीप पाटील यांचा विजय झाला आहे; तर खानिवली ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे गटाच्या भरत हजारे यांनी सुरेश पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलचा पराभव करून सेनेचा झेंडा फडकवला आहे. गोऱ्हे ग्रामपंचायतीत माजी उपसरपंच अनिल खिलारे यांनी भाजपच्या पॅनेलला पराभवाची धूळ चारली आहे. गुंज ग्रामपंचायतीत सत्तेत असलेल्या मोहन पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हरोसाळा ग्रामपंचायतीत सतत सहाव्यांदा उद्धव गटाने बाजी मारली आहे. तुसा, मोज, अब्जा, चिखला या ग्रामपंचायतींत उद्धव ठाकरे गटाला पराभव पत्करावा लागला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने १६ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याची माहिती सहसंपर्क प्रमुख नीलेश गंधे यांनी दिली.