कल्याण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता
कल्याण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता

कल्याण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता

sakal_logo
By

टिटवाळा, ता. १७ (बातमीदार) कल्याण तालुक्यातील सातपैकी पाच ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला तीन, महाविकास आघाडी दोन, तर उद्धव ठाकरे सेनेला व ग्रामविकास पॅनेलला प्रत्येकी एक सरपंचपद मिळाले आहे.
७ ग्रामपंचायतींपैकी फळेगाव व उशीद ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासह १४ सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे येथे निवडणुका झाल्या नाहीत. उर्वरित दहिवली-आडीवली, केळणी-कोळीब, मामनोली, रुंदे, वाहोली या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान झाले. सोमवारी सकाळी अकरा वाजता पंचायत समितीच्या सभागृहात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. वाहोली ग्रामपंचायत सरपंचपदी सहिम सरवले निवडून आले; तर दहिवली-आडीवली सरपंचपदी कमलाकर राऊत, केळणी-कोलिंब ग्रामपंचायत सरपंचपदी राजेश भोईर, मामणोली सरपंचपदी तुषार कोर, रुंदे सरपंचपदी नरेश चौधरी हे थेट सरपंच म्हणून निवडून आले.
फळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारती पाटील बिनविरोध, उशीद ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून सुवर्णा भोईर यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रथमच थेट सरपंचपदासाठी निवडणुका पार पडल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

……………………….
वीस वर्षांनंतर मिळाला सरपंच
वाहोली गावातील ग्रामस्थांनी यापूर्वीच्या पाच ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता. यावेळी बहिष्कार न टाकता गावातील उच्चशिक्षित तरुणास सरपंचपद देण्याचा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे वाहोली गावाला २० वर्षांनंतर सरपंचपद मिळाले; तर मुस्लिम समाजाला २७ वर्षांनंतर या पदाचा मान मिळाला आहे. सहिम सरवले यांना गावाच्या विकासासाठी सरपंचपदी निवडून दिले आहे.