पोलिसांच्या तावडीतून आरोपीचे पलायन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांच्या तावडीतून आरोपीचे पलायन
पोलिसांच्या तावडीतून आरोपीचे पलायन

पोलिसांच्या तावडीतून आरोपीचे पलायन

sakal_logo
By

पनवेल (वार्ताहर) : बांग्लादेशात डिपोर्टेशन कारवाईसाठी पोलिस ठाण्यात निगराणीखाली ठेवलेल्या एका बांगलादेशी आरोपीने गुदमरत असल्याचा बहाणा करून पोलिसांच्या तावडीतून पलायन केल्याची घटना घडली आहे. अमिरुल ऊर्फ प्रकाश मन्नन खान (२३) असे या आरोपीचे नाव असून खारघर पोलिस त्याचा शोध घेत आहे. खारघरमधील इस्कॉन मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरी प्रकरणात अमिरुल ऊर्फ प्रकाश मन्नन खान व त्याचा साथीदार राजू परहाक शेख यांना जानेवारी महिन्यात गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने १४ फेब्रुवारी रोजी खारघरमधील ओवे गाव कॅंपमधून अटक केली होती. या दोघांच्या चौकशीत दोघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे समोर आले होते. पनवेल न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या दोघांना दोषी ठरवून चोरी प्रकरणात शिक्षा ठोठावली होती. तसेच १० ऑक्टोबरला शिक्षा पूर्ण झाल्यानंतर दोघांनाही बांगलादेशात रवानगी (डिपोर्टेशन) करण्याचे आदेश दिले होते.