दुचाकी अपघातात शेतक-याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी अपघातात शेतक-याचा मृत्यू
दुचाकी अपघातात शेतक-याचा मृत्यू

दुचाकी अपघातात शेतक-याचा मृत्यू

sakal_logo
By

सरळगांव, ता. १७ (बातमीदार) : कल्याण-माळशेज घाट या राष्ट्रीय महामार्गावरील शिवळे गावानजीक झालेल्या अपघातात एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. शिवळे गावातील शेतकरी सुदाम गणपत पवार हे आपल्या शेतावरून घरी येत असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांनी उपचारांसाठी मुरबाड येथे नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. या अपघाताची नोंद मुरबाड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.