मुंबई, ठाण्यामध्ये अमूलची एका दिवसात डिलीव्हरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई, ठाण्यामध्ये अमूलची एका दिवसात डिलीव्हरी
मुंबई, ठाण्यामध्ये अमूलची एका दिवसात डिलीव्हरी

मुंबई, ठाण्यामध्ये अमूलची एका दिवसात डिलीव्हरी

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : उत्पादनांची शुद्धता आणि चवीसाठी अमूल ब्रँडची ओळख आहे. सणासुदीमध्ये मुंबई, ठाणे परिसरातील ग्राहकांसाठी अमूलने एका दिवसात घरपोच मिठाई डिलीव्हरीची सुविधा सुरू केली आहे. shop.amul.com या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर खरेदी केल्यावर निःशुल्क मिठाई पोहोचवण्याचे काम करण्यात येईल. ग्राहकांना तात्काळ मिठाई मिळण्यासाठी नवी मुंबईतील तळोजा येथील आधुनिक सुविधांनी सज्ज असणाऱ्या प्रकल्पात ही उत्पादने बनवण्यात येत आहेत. २०० ग्रॅमच्या दोन पॅकमधून काजू कत्री, मलाई पेढा, केशर पेढा, मिल्क केक, मोतिचूर लाडू, बेसण लाडू, गूळ काजू कत्री ही मिठाईची उत्पादने घरपोच मिळतील, असे कंपनीकडून सांगण्यात आले.