लाच घेताना एमआयडीसीचा उपकार्यकारी अभियंता अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाच घेताना एमआयडीसीचा उपकार्यकारी अभियंता अटकेत
लाच घेताना एमआयडीसीचा उपकार्यकारी अभियंता अटकेत

लाच घेताना एमआयडीसीचा उपकार्यकारी अभियंता अटकेत

sakal_logo
By

ठाणे, ता. १७ (वार्ताहर) : ठाणे जिल्ह्यातील बारवी धरण विश्रामगृहाची देखभाल आणि इतर कामासाठी भरलेल्या टेंडरच्या बिलात त्रुटी न काढता बिल मंजुरीसाठी एमआयडीसीचे उपकार्यकारी अभियंता संजय नथुराम माने (वय ५५) यांनी ठेकेदाराला ७८ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर ५० हजार रुपयांवर तडजोड करीत रक्कम स्वीकारताना लाचलुचपत खात्याच्या पथकाने सापळा रचून माने याला अटक केली. एमआयडीसीचे उपकार्यकारी अभियंता म्हणून राज्य औद्योगिक विकास महामंडळ, बारवी धरण विभाग, अंबरनाथ, ठाणे येथे संजय नथुराम माने कार्यरत आहेत. ठेकेदार यांनी घेतलेल्या निविदांची बिले मंजुरीसाठी माने यांनी ठेकेदाराला ७८ हजारांची मागणी केली आहे. हा ठेका दोन लाख २० हजार ३२६ रुपयांचा होता. अखेर तडजोडीपोटी लाचेची रक्कम ५० हजारांवर निश्चित झाली. याबाबत ठकेदाराने लाचलुचपत खात्याकडे १४ ऑक्टोबर रोजी तक्रार केली. लाचलुचपत खात्याने १७ ऑक्टोबर रोजी सापळा रचून आरोपी माने यांना अटक केली.