मुंबईवर पाणीकपातीचे संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईवर पाणीकपातीचे संकट
मुंबईवर पाणीकपातीचे संकट

मुंबईवर पाणीकपातीचे संकट

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : पाणीपुरवठा यंत्रणेत पिसे येथील बंधाऱ्याची महत्त्वाची भूमिका असते. या बंधाऱ्याच्या ‘न्यूमॅटिक गेट’च्या परीक्षणाचे काम चालू असल्यामुळे मुंबईतील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची आंशिक शक्यता आहे. त्यामुळेच पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे. १८ व १९ ऑक्टोबरला शहर व उपनगरात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.