Sun, Jan 29, 2023

रस्त्यावरील चेंबर तुटले
रस्त्यावरील चेंबर तुटले
Published on : 18 October 2022, 11:54 am
गोरेगाव, ता. १८ (बातमीदार) : गोरेगाव पूर्व येथील जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग येथील बसस्टॉपजवळ असलेले चेंबर तुटले आहे. यामुळे रिक्षा, दुचाकींचे अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या चेंबरची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. हे चेंबर दुरुस्त न झाल्यास मोठा अपघात होण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.