
वसईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस वचनबद्ध : नाना पटोले
विरार, ता. १८ (बातमीदार) : वसईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले. पटोले हे वसईच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी वसईत विविध ठिकाणी भेटी देऊन जनतेशी संवाद साधला.
मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची भेट घेऊन पटोले यांनी त्यांची विचारपूस केली; तर सायंकाळी काँग्रेस भवन, पारनाका वसई येथे वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी सर्व ब्लॉक अध्यक्ष, सेल जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होते. ते म्हणाले, वसईकर जनतेच्या समस्यांबाबत काँग्रेस जागृत आहे; तर प्रदेश काँग्रेसचे नेते विजय पाटील, जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा यांचा वसईकर जनतेबद्दल असलेली कटिबद्धता याची प्रशंसा केली. वसई तालुक्यातील काँग्रेस कार्याची दखल घेत लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणुकींबाबत प्रदेश काँग्रेसतर्फे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सहकार्य केले जाईल, असे आश्वासन पटोले यांनी विजय पाटील व ओनिल अल्मेडा यांना दिले. या बैठकीला प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हा प्रभारी तथा प्रदेश सरचिटणीस जोजो थॉमस, जिल्हा सरचिटणीस किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष डॉमनिक डिमेलो, वसई तालुका ग्रामीण अध्यक्ष राम पाटील, विरार ब्लॉक अध्यक्ष नितीन उबाळे, नालासोपारा ब्लॉक अध्यक्ष कुमार काकडे, नवघर माणिकपूरचे विल्फ्रेड डिसूझा, वसईच्या अध्यक्षा बिना फुर्ट्याडो, सेलचे जिल्हाध्यक्ष रामदास वाघमारे, बोईसर विधानसभा अध्यक्ष शहजाद मलिक, युवा जिल्हाध्यक्ष निखिलेश उपाध्याय, महिला जिल्हाध्यक्ष प्रवीणा चौधरी, व्हीजेएनटीचे जिल्हाध्यक्ष आनंद चव्हाण, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अर्षद डबरे, सेवा दल जिल्हाध्यक्ष रतन तिवारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.