
एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर आक्रोश मेळावा
ठाणे, ता. १८ (बातमीदार) : धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या प्रमुख मागणीसाठी ६ नोव्हेंबर २०२२ रोजी संभाजीनगर येथे धनगर आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला समाजबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केले आहे. ठाण्यातील मनोरमानगर येथे धनगर समाज संघर्ष समिती ठाणे शहर यांच्या वतीने आयोजित नियोजन बैठकीत डॉ. महात्मे बोलत होते.
६ नोव्हेंबर २०२२ रोजी संभाजीनगर (औरंगाबाद) येथील हर्सुल हरसिद्धी माता मंदिर येथे धनगर आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी खासदार डॉ. विकास महात्मे, समाजाचे नेते शंकर कोळेकर, ठाणे जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पत्रकार दीपक कुरकुंडे, अनिता हिलाळ, अजय हाक्के, मंगल कोळेकर, अखिलेश पाल, संदीप माने, वर्षा माने, सनी कोकरे, दिंगबर लवटे, सुकदेव तरगे, नरहरी कोकरे, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संदीप पाढरे, तुषार धायगुडे, अंकुश उघाडे, गणेश गढरी, उत्तम यमगर, धनगर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे रवींद्र परदेशी, रमेश परदेशी, राकेश परदेशी यांनी उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघातर्फे मेळाव्याला पाठिंबा जाहीर केला.