‘विद्यार्थ्यांनी देश उभारणीत योगदान द्यावे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘विद्यार्थ्यांनी देश उभारणीत योगदान द्यावे’
‘विद्यार्थ्यांनी देश उभारणीत योगदान द्यावे’

‘विद्यार्थ्यांनी देश उभारणीत योगदान द्यावे’

sakal_logo
By

कल्याण, ता. १८ (बातमीदार) : देशाला शैक्षणिक परंपरेचा मोठा वारसा लाभला असून विद्यार्थ्यांनी करिअर घडवून देश उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले. छत्रपती शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्यामंदिर शाळेत झालेल्या धन्यवाद मोदी उपक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी, उपाध्यक्ष एन. के. फडके, भारतीय युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील, संस्थेच्या चिटणीस मीनाक्षी गागरे, भारती वेदपाठक, संस्थेचे मार्गदर्शक बाबा जोशी, माजी सरचिटणीस मनोहर ठाकूर देसाई, कार्यकारिणी सदस्य किशोर आल्हाट, भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, मुख्याध्यापक संपत गीते आदी उपस्थित होते.
पुढील २० वर्षांचा वेध घेत देशाला नवीन शैक्षणिक धोरण मिळाले. देशातील शाळा अद्ययावत व्हाव्यात, यासाठी देशभरातील १४ हजारांहून अधिक ‘पीएम श्री शाळा’ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून देशाला महासत्ता बनविण्याचे पंतप्रधानांनी ठरविले असल्याचे पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद करताना सांगितले.