Thur, Feb 2, 2023

पारसिकनगर येथे ‘अल्बीनो’ला जीवदान
पारसिकनगर येथे ‘अल्बीनो’ला जीवदान
Published on : 18 October 2022, 10:55 am
कळवा, ता. १८ (बातमीदार) कळवा पारसिकनगर येथे तस्कर जातीच्या भारतात आढळणाऱ्या निरुपद्रवी बिनविषारी सापाला जीवदान देण्यात आले. इंग्रजीत याला ट्रिंकेट; तर शास्त्रीय भाषेत अल्बिनो असे संबोधले जाते.
पारसिकनगरजवळील गॅलेक्सी टॉवरसमोरील भंगाराच्या दुकानात हा साप आढळून आला. लागलीच जीवोहम चॅरिटीजचे सभासद सर्पमित्र किशोर साळवी यांनी सदर ठिकाणी जाऊन सापाला पकडले. या सापाला वनअधिकारी संदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. वाचविण्यात आलेल्या अल्बिनो सापाची लांबी साधारणपणे एक फूट आहे. रंगद्रव्य (मेलॅनिन) च्या कमतरतेमुळे इतर सापांपेक्षा हा वेगळा दिसतो.