पीएम किसान योजनेचे अनुदान जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएम किसान योजनेचे अनुदान जमा
पीएम किसान योजनेचे अनुदान जमा

पीएम किसान योजनेचे अनुदान जमा

sakal_logo
By

जव्हार, ता. १८ (बातमीदार) : पंतप्रधान किसान निधी सन्मान योजनेचा बारावा हप्ता मिळावा, याकरिता जव्हार तालुक्यातील १२,४०० शेतकरी प्रतीक्षेत होते. सोमवारी शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाल्यानंतर या शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत दिलासा मिळाला आहे.
ज्या खातेदारांची ई-केवायसी बाकी आहे, त्यांनाही याचा लाभ मिळाल्याचे प्रशासनाने सांगितले. पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. या योजनेमधील ११ वा हप्ता जानेवारी महिन्यात खातेदारांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर चार महिन्यांनी बारावा हप्ता मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. आता तब्बल आठ महिन्यांनी दिवाळी हप्ता जमा झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.