Mon, Feb 6, 2023

भंडारी समाजाचा वधू वर मेळावा
भंडारी समाजाचा वधू वर मेळावा
Published on : 18 October 2022, 11:20 am
प्रभादेवी, ता. १८ (बातमीदार) : भंडारी समाजातील व्यक्तींसाठी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दादर येथील कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळ या संस्थेच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन केले होते. यात एकूण १५० मुला–मुलींनी सहभाग घेत परिचय पत्रकात नाव नोंदणी केली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष भरत शेटे, प्रभाकर पोळेकर, अक्षदा कीर, भूपेंद्र देवकर आदी उपस्थित होते.