मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेच्या कामाला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेच्या कामाला वेग
मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेच्या कामाला वेग

मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेच्या कामाला वेग

sakal_logo
By

कासा, ता. १८ (बातमीदार) : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला गुजरातशी जोडणाऱ्या मुंबई-वडोडारा एक्स्प्रेस वेच्या कामाला वेग आला आहे. यासाठी गंजाड येथे सपाटीकराचे काम सुरू आहे. या कामात बाधित होणाऱ्या झाडांची छाटणी केली जात आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात संथगतीने सुरू असलेल्या मुंबई-वडोडारा एक्स्प्रेस वेच्या कामाला नवीन सरकार येताच गती मिळाली आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्या असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. गंजाड येथे महामार्गांवर चढण्यासाठी, उतरण्यासाठी मार्ग ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गंजाड येथे सपाटीकरणाचे काम सुरू झाले आहे. यासाठी या कामामुळे बाधित होणाऱ्या झाडांची छाटणी केली जात आहे. येथून डहाणू-नाशिक राज्य मार्ग गेल्याने एक्स्प्रेस वेसाठी मोठा उड्डाणपुल बनवण्यात येणार आहे.