
वसईमध्ये दृष्टीहिनांचे स्नेहसंमेलन
विरार, ता. १८ (बातमीदार) : महाराष्ट्राच्या राष्ट्रीय दृष्टिहीन शिक्षण व पुनर्वसन संस्थेतर्फे वर्ल्ड व्हाईट केन डे निमित्त वसईतील देवतलाव येथील फा. बर्नड भंडारी हॉलमध्ये दृष्टिहीनांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. एम. डी. डाबरे होते. या वेळी संस्थेतर्फे दृष्टिहीनांसाठी व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी अनाथालय, वृद्धाश्रम, शाळा, प्रशिक्षण केंद्र असे विविध प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी सर्व काही कायदेविषयक मदत करण्याचे आश्वासन अॅड. डाबरे यांनी या वेळी दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष योगेश चौधरी यांनी केले; तर गार्डवेल इंडस्ट्रीजचे संचालक विल्यम तुस्कानो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे सेक्रेटरी पीटर फर्नांडिस यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. या वेळी दृष्टिहीन सभासदांना भेटवस्तू देण्यात आल्या.