
खर्डी ग्रामपंचायत सरपंचपदी मंगला गावित
खर्डी, ता. १८ (बातमीदार) : खर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिलीप अधिकारी यांच्या ग्रामसन्मान पॅनलने बाजी मारली असून सरपंच मंगला गावित यांच्यासहित मोसीन शेख, बाळा घारे, एस. चौधरी, दिनेश सदगीर, छाया केदारे, सुली सालकर आदी उमेदवार विजयी झाले आहेत.
गणेश जाधव यांच्या ग्रामविकास पॅनलला पाच ठिकाणी विजय मिळाला आहे. यामध्ये माजी सरपंच प्रशांत खर्डीकर व जनसेवक शाम परदेशी यांच्या कन्या पूजा परदेशी व प्रतिभा घरत, प्रकाश किरकिरे, सुवर्णा खाडे यांनी अटीतटीच्या लढतीत बाजी मारली आहे. उपेंद्र सोनार यांच्या संघर्ष पॅनलने दोन जागा मिळवत सीमा डिगे व रवी भांगरे यांनी ठिकाणी विजय मिळवला आहे.
…………………..
शहापुरात जिजाऊने खाते उघडले
शहापूर तालुक्यात जिजाऊ संघटनेचे पाच सरपंच व ४६ सदस्य निवडून आले आहेत. लीलाबाई वाघे (सरपंच, शेई ग्रामपंचायत), नारायण दरोडा (सरपंच, सारंगपुरी), विजय कालचिडा (सरपंच, हीव), सुगंधा वीर (सरपंच, धामणी), रंजना गिरा (सरपंच, साकडबाव) या ठिकाणी नीलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेने खाते उघडले असल्याचे तालुकाध्यक्ष सुदर्शन पाटील यांनी सांगितले आहे.