डेंगी आणि स्वाईनचा पुन्हा ताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगी आणि स्वाईनचा पुन्हा ताप
डेंगी आणि स्वाईनचा पुन्हा ताप

डेंगी आणि स्वाईनचा पुन्हा ताप

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : परतीच्या पावसामुळे मुंबईत पुन्हा आजाराचा संसर्ग सुरू झाला आहे. कडाक्याचा उन्हाळा आणि पावसाळी वातावरणामुळे आजार पुन्हा वाढू लागले आहेत. पालिकेने जाहीर केलेल्या अहवालानुसार, मुंबईत सध्या डेंगी आणि ‘एच १ एन १’ (स्वाईन फ्लू)चे रुग्ण वाढू लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी दोन्ही आजारांवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले होते; पण आता त्यांनी पुन्हा डोके काढल्याने पालिकेने खबरदारीचे आवाहन केले आहे.
२०२० आणि २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये स्वाईन फ्ल्यूचे एकूण ३२५ रुग्ण आढळले आहेत. २०२० मध्ये ४४ आणि २०२१ च्या पूर्ण वर्षात ६४ रुग्णांची नोंद झाली होती. यंदा स्वाईनच्या रुग्णांमध्ये जवळपास तिपटीने वाढ झाली आहे.

मुंबईत ९ ते १६ ऑक्टोबरदरम्यान मलेरिया-डेंगीच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. मलेरियाचे १२०, लेप्टोचे १८, डेंगीचे ७८, गॅस्ट्रोचे ७७, हेपेटायसिसचे ९, चिकनगुनियाचे ० आणि स्वाईन फ्ल्यूच्या सहा रुग्णांची नोंद झाली होती. १ ते १६ ऑक्टोबरपर्यंत मलेरियाचे १७७, लेप्टोचे ३१, डेंगीचे १७८, गॅस्ट्रोचे १६१, हेपेटायसिसचे १९, चिकनगुनियाचे १ आणि स्वाईन फ्लूच्या १३ रुग्णांची नोंद झाली आहे.


मुंबईत स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ताप, खोकला, घशात खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, डायरिया, उलटी आदी लक्षणे असलेल्या नागरिकांनी त्वरित उपचार करून घ्यावेत. नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून घ्यावे. हात साबणाने स्वच्छ धुवावेत. मोठ्या प्रमाणात ताप आला असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि त्वचा वा ओठ निळे पडल्यास त्वरित पालिकेच्या रुग्णालयात उपचार करून घ्यावे.
- डॉ. मंगला गोमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालका आरोग्य विभाग

रुग्णांची आकडेवारी
आजार         जाने. ते आॅक्टो.    मृत्यू    १ ते १६ आॅक्टो.   मृत्यू
मलेरिया     ३२२८            १    १७७            ०
लेप्टो         २४१            १    ३१            ०
डेंगी         ७४६            २    १७८            ०
गॅस्ट्रो         ४५८४            ०    १६१            ०
हेपेटायटिस    ४५७            ०    १९            ०
चिकनगुनिया     १२            ०    ०१            ०
स्वाईन फ्ल्यू    ३२५            २    १३            ०