पनवेलमध्ये ‘चोगाडा नाईट’चा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलमध्ये ‘चोगाडा नाईट’चा जल्लोष
पनवेलमध्ये ‘चोगाडा नाईट’चा जल्लोष

पनवेलमध्ये ‘चोगाडा नाईट’चा जल्लोष

sakal_logo
By

पनवेल, ता. १८ : रोटरीच्या फंड रेझिंग उपक्रमाअंतर्गत शनिवारी (ता. १५) पनवेल येथील बालाजी बँक्वेट हॉलमध्ये दांडिया-गरबाचा ‘चोगाडा नाईट’ हा जल्लोषपूर्ण कार्यक्रम झाला. या वेळी विविध गाण्यांवर उपस्थितांनी मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतला. रोटरी क्लब ऑफ पनवेल, गार्गीज ग्राफिक्स आणि इनरव्हील क्लब ऑफ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.
पनवेलमधील व्यावसायिक, उद्योजक, रोटेरियन्स मित्र-परिवारासोबत या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या वेळी पनवेल परिसर, खारघर, नवी मुंबई व मुंबईहून आलेले विविध वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आयोजकांकडून सहभागी स्पर्धकांवर बक्षिसांची लयलूट करण्यात आली. त्यात वैयक्तिक, ग्रुप स्पर्धांसोबत सर्वोत्तम डान्सर, वेशभूषा, जोडी या विविध गटांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. त्यात श्रुती देसाई ही स्कुटीची मानकरी ठरली. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे अध्यक्ष रोटेरिअन डॉ. अनिल परमार यांच्यासह विविध रोटरी क्लबचे मान्यवर उपस्थित होते.