गोवंडीच्या प्रदूषणाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रासमोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवंडीच्या प्रदूषणाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रासमोर
गोवंडीच्या प्रदूषणाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रासमोर

गोवंडीच्या प्रदूषणाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रासमोर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : गोवंडीच्या परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रदूषणाचे प्रकरण आता संयुक्त राष्ट्रात मांडण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या बेस्ट डिप्लोमॅट्ससाठी गोवंडीचा शेख फय्याज आलम हा स्थानिकांची व्यथा जागतिक पातळीवर मांडणार आहे. येत्या जानेवारी २०२३ मध्ये मलेशिया येथे होणाऱ्या एका परिषदेत गोवंडीतील हवेच्या प्रदूषणाचा मुद्दा मांडण्यात येणार आहे.
गोवंडी हा पूर्व उपनगरात प्रदूषणाचा हॉटस्पॉट ठरतोय. गेल्या काही वर्षांत या परिसरात वाढलेल्या प्रदूषणामुळे स्थानिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये सर्वाधिक टीबी आणि दम्याचा आजार स्थानिकांना भेडसावत आहे. नुकत्याच झालेल्या आझादी का अमृतमहोत्सव या १५ ऑगस्ट दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी स्थानिकांनी घरोघरी झेंडे लावण्याऐवजी हवा स्वच्छ करणारी उपकरणे लावण्याचा निर्णय घेतला होता. याप्रकरणी केंद्रातून तसेच न्यायालयातूनही या प्रदूषणाची दखल घेण्यात आली आहे.
...
स्थानिक म्हणून आम्ही हा मुद्दा विविध पातळ्यांवर मांडला आहे. त्यामध्ये रहिवाशांच्या बाजूने निकाल लागला आहे. त्यामुळेच या मुद्द्यांची तीव्रता लक्षात घेऊनच आम्ही हा विषय आता संयुक्त राष्ट्राच्या डिप्लोमॅट परिषदेतही मांडणार आहोत.
- फय्याज आलम, रहिवासी, गोवंडी