Mon, Jan 30, 2023

मुंबई विमानतळावर ४० कोटीचा गांजा जप्त
मुंबई विमानतळावर ४० कोटीचा गांजा जप्त
Published on : 18 October 2022, 3:57 am
मुंबई, ता. १८ : मुंबईत गुप्तचर महसूल संचालनालयातर्फे ८६.५ किलो उच्च दर्जाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. मुंबई विमानतळावर डीआरआयच्या पथकाने कारवाई करत गांजा जप्त केला. जप्त गांजाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास ४० कोटीपर्यंत असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात तपासादरम्यान दोन आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.