इसुझु मोटर्स इंडियाकडून पुण्‍यामध्‍ये नवीन शोरूम लॉन्‍च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इसुझु मोटर्स इंडियाकडून पुण्‍यामध्‍ये नवीन शोरूम लॉन्‍च
इसुझु मोटर्स इंडियाकडून पुण्‍यामध्‍ये नवीन शोरूम लॉन्‍च

इसुझु मोटर्स इंडियाकडून पुण्‍यामध्‍ये नवीन शोरूम लॉन्‍च

sakal_logo
By

चेन्‍नई, ता. २१ : इसुझू मोटर्स इंडियाने पुण्‍यातील ग्राहकांसाठी ब्रॅण्‍ड टचपॉइण्‍ट वाढवण्‍याच्‍या प्रयत्‍नांचा भाग म्हणून ‘बावरिया इसुझू’च्‍या नवीन शोरूमचे उद्घाटन केले. हे शोरूम नगर रोड, वाघोली येथे असून त्‍यामध्‍ये थीमॅटिक व्हेईकल पाहायला मिळतात.
बावरिया इसुझू २०१९ पासून ब्रॅण्‍ड इसुझूचे प्रतिनिधित्व‍ करत आहे. इसुझू डी-मॅक्‍स पिक-अप्‍स (लाईफस्‍टाईल व क‍मर्शियल) व एमयू-एक्‍स एसयूव्‍हीच्‍या श्रेणीची विक्री करत आहे. इसुझू मोटर्स इंडिया व बावरिया इसुझूमधील अव्‍वल व्‍यवस्‍थापनाच्‍या हस्‍ते या नवीन शोरूमचे उद्घाटन करण्‍यात आले. या वेळी कंपनीचे अधिकारी व निवडक ग्राहकदेखील उपस्थित होते.

इसुझूकडून प्रशिक्षण घेतलेले विक्री कर्मचारी या नवीन सुविधेचे व्‍यवस्‍थापन पाहतील. उद्घाटनाप्रसंगी बोलताना इसुझू मोटर्स इंडियाचे उपव्‍यवस्‍थापकीय संचालक तोरू किशिमोटो म्‍हणाले, पुणे हे इसुझूसाठी देशातील प्रमुख शहर आहे. जगप्रसिद्ध डी-मॅक्‍स पिक-अप्‍स आमच्‍या ग्राहकांना विविध व्‍यवसायांमध्‍ये अमाप उत्‍पन्‍न प्राप्‍त करू देत आहेत. शहरामध्‍ये अनेक ऑटो-उत्‍साहीदेखील आहेत, जे इसुझू लाईफस्‍टाईल व्हेईकल्‍सची विश्‍वसनीयता व वैविध्‍याचे प्रशंसक आहेत. आज नवीन सु‍विधेच्‍या उद्घाटनासह मी टीम बावरिया इसुझूला आमच्‍यासोबतच्‍या त्‍यांच्‍या प्रवासासाठी शुभेच्‍छा देतो. बावरिया इसुझूचे व्‍यवस्‍थापकीय संचालक विशाल अग्रवाल म्‍हणाले, आम्‍ही ४ वर्षांपासून इसुझूशी संलग्‍न आहोत आणि आम्‍हाला शहरामधून डी-मॅक्‍स पिक-अप श्रेणी व एमयू-एक्‍स एसयूव्‍हीसाठी प्रचंड मागणी आहे. पुणे व आसपासच्‍या जिल्‍ह्यांमध्‍ये उत्‍साहवर्धक व कार्यक्षम युटिलिटी वेईकल्‍ससाठी मागणी लक्षणीयरीत्‍या वाढत आहे. आम्‍ही उत्‍पादन क्षमतांचा लाभ घेत आमच्‍या ग्राहकांना योग्‍य उत्‍पादन व योग्‍य सेवा मिळण्‍याची काळजी घेऊ.