हेल्दी अँड टेस्टीचे रिलॉन्चिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेल्दी अँड टेस्टीचे रिलॉन्चिंग
हेल्दी अँड टेस्टीचे रिलॉन्चिंग

हेल्दी अँड टेस्टीचे रिलॉन्चिंग

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : इमामी समूहाचा ब्रॅण्डेड अन्न उत्पादन विभाग असलेल्या इमामी अग्रोटेक लिमिटेडने आघाडीच्या खाद्यतेलाच्या ब्रॅण्ड्सपैकी एक हेल्दी अँड टेस्टी रिलाँच केला आहे. २०१० मध्ये बाजारात आलेला इमामी हेल्दी अँड टेस्टी हा ब्रॅण्ड पश्चिम बंगालमधील बाजारपेठेत आघाडीवर आहे. २०१७ मध्ये राष्ट्रीय स्तरावर लाँच करण्यात आल्यापासून उत्तर व पश्चिम भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या ब्रॅण्ड्सपैकी हा एक आहे. या रिलाँचच्या माध्यमातून पुढील ३-५ वर्षांत व्यवसायाची उलाढाल ५००० कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट ब्रँडने ठेवले आहे.

या रिलाँचचा एक भाग म्हणून इमामी हेल्दी अँड टेस्टीने आपल्या मस्टर्ड (राई तेल), सोयाबीन, सनफ्लॉवर (सूर्यफूल) आणि राईस ब्रान या चार प्रकारांमध्ये पूर्णपणे नवीन पॅकेजिंग मेकओव्हर केले आहे. नवीन पॅकेजिंग अत्यंत आधुनिक, समकालीन व आटोपशीर स्वरूपाचे आहे आणि खाद्यतेल विभागात वेगळे उठून दिसणारे आहे. या नवीन पॅक्समध्ये अव्वल दर्जाच्या प्रतिमा आहेत. ब्रॅण्डच्या भारतीयत्वात रुजलेली नैसर्गिक वैशिष्ट्यपूर्ण ओळख सांगणारी उगमकथा या प्रतिमांमधून उलगडली जाते. ब्रॅण्डने अभिनेत्री कतरिना कैफला आपली देशभरातील ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. ती ब्रॅण्डच्या मस्टर्ड ऑईलच्या जाहिरातीत अभिनेता रवी किशनसोबत दिसणार आहे.