भरधाव एक्स्प्रेसचा पत्रा उडून प्रवाशी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरधाव एक्स्प्रेसचा पत्रा उडून प्रवाशी जखमी
भरधाव एक्स्प्रेसचा पत्रा उडून प्रवाशी जखमी

भरधाव एक्स्प्रेसचा पत्रा उडून प्रवाशी जखमी

sakal_logo
By

खर्डी, ता. २१ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या कसाऱ्याजवळील उंबरमाळी रेल्वे स्थानकावर भरधाव पटना एक्स्प्रेसचा एक लोखंडी पत्रा उडून स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवाशाला लागल्याची घटना समोर आली आहे. या प्रवाशाच्या पायाला दुखापत झाली. या वेळी स्थानकात उभे असलेले इतर प्रवासी मोठा आवाज आल्याने दूर झाल्याने ते बचावले. रेल्वेच्या या हलगर्जीपणामुळे प्रवासी जखमी झाल्याने त्याला आर्थिक मदत करण्याची मागणी प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव यांनी केली आहे. आज सकाळी मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या पटना एक्स्प्रेसचा लोखंडी पत्र्याचा एक तुकडा उडाल्याने नीलेश पांडुरंग सावंत हा मजूर जखमी झाला. जखमी नीलेशला नेण्यासाठी एका तासाने रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असून अशा घटना वारंवार घडत आहेत. या वेळी एक्स्प्रेसचे मेंटनन्स वेळेवर होत नसल्याने अशा घटना घडत आल्याने रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे, अशी प्रतिक्रिया कल्याण-कसारा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली.