भिवंडीत आशा स्वयंसेविकांचे ओवाळणी आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत आशा स्वयंसेविकांचे ओवाळणी आंदोलन
भिवंडीत आशा स्वयंसेविकांचे ओवाळणी आंदोलन

भिवंडीत आशा स्वयंसेविकांचे ओवाळणी आंदोलन

sakal_logo
By

भिवंडी, ता. २१ (बातमीदार) : दिवाळी आली की सर्व कर्मचाऱ्यांना हक्काचा बोनस दिला जातो; मात्र समाजात आणि गरीब लोकवस्तीत खऱ्या अर्थाने आरोग्य जनजागृती करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना बोनस मिळत नाही. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे सरचिटणीस भगवान दवणे यांच्या नेतृत्वाखाली आशा स्वयंसेविकांनी पालिका मुख्यालयासमोर ओवाळणी आंदोलन केले आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात १४२ आशा स्वयंसेविका कार्यरत असून तुटपुंज्या ३ ते ५ हजार रुपये मानधनावर ते काम करीत आहेत. शासन अंगणवाडी सेविकांनादेखील दोन हजार रुपये भाऊबीज भेट देते; परंतु आशा स्वयंसेविकांना बोनस दिला जात नाही. या वेळी आशा स्वयंसेविका यांना दिवाळी सणानिमित्ताने बोनस देणे अत्यावश्यक असून ही मागणी भिवंडी मनपा आणि शासनापर्यंत पोहोचावी, याकरिता हे अनोखे आंदोलन आमच्या भगिनी करीत असल्याची माहिती भगवान दवणे यांनी दिली आहे.