ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

sakal_logo
By

भिवंडी, ता. २१ (बातमीदार) : मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे बायपासवरून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या चालकाला ट्रक चालवताना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली. या चालकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ट्रक क्रमांक जीजे- १६ एव्ही- १४५० या ट्रकचा चालक अविनाश पाल (वय २४, रा. सुल्तानपूर, उत्तर प्रदेश) हा नाशिकच्या दिशेने जात असताना दिवे गावाच्या हद्दीत ट्रक चालवत असताना त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे तो ट्रक कॅबिनच्या दरवाजावर कोलमडला. ट्रक रस्त्यातच थांबल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी झाली असता वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक सचिन खताळ व पोलिस कर्मचारी भोसले यांच्यासह वाहतूक कोंडीचे कारण शोधत होते. तेव्हा त्यांना ही घटना समजली. त्यांनी तत्काळ ट्रकचालकास बाहेर काढून रिक्षाने मानकोली येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी अविनाशला मृत घोषित केले. या वेळी वाहतूक कोंडीच्या मनस्तापाने चालकांच्या मनावर व शरीरावर ताण येत असून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन व्यवस्थेला अपयश येत आहे, अशी प्रतिक्रिया या मार्गावरील चालकांनी व्यक्त केली.