कोपरखैरणेतील हत्येची पोलिसांनी केली उकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपरखैरणेतील हत्येची पोलिसांनी केली उकल
कोपरखैरणेतील हत्येची पोलिसांनी केली उकल

कोपरखैरणेतील हत्येची पोलिसांनी केली उकल

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : कोपरखैरणेतील साहिल शांताराम गोळे या १७ वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणाची उकल करण्यात कोपरखैरणे पोलिसांना यश आले आहे. साहिलची हत्या त्याच्याच चौघा मित्रांनी केल्याचे उघडकीस आले असून यात तीन अल्पवयीन तरुणांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आपसातील वादातून चौघांनी ही हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. कोपरखैरणे, सेक्टर-१५ मध्ये राहणारा साहिल गोळे हा कोपरखैरणेतील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण घेत होता. साहिल गत मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास कामावर जातो, असे सांगून घरातून निघून गेला होता; मात्र तो कामावर न जाता आपल्या मित्रांसोबत कोपरखैरणे सेक्टर- २३ मधील भूमिपुत्र गार्डनमध्ये फिरत होता. रात्री ११.३० वाजता साहिलच्या आईने त्याला फोन केला असता, साहिलने कामावर असल्याचे आईला सांगितले होते. मात्र मध्यरात्री साहिल आणि त्याच्या मित्रांमध्ये आपापसातील जुन्या वादातून भांडण झाले. या भांडणात त्याच्या चौघा मित्रांनी साहिलच्या डोक्यावर दगडाने हल्ला करून तसेच त्याच्या ओंठावर व पोटावर तीक्ष्ण हत्याराने भोसकून त्याची हत्या केली. त्यानंतर चौघांनी पलायन केले.