सीट बेल्ट वापराची प्रभावी अंमलबजावणी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीट बेल्ट वापराची प्रभावी अंमलबजावणी होणार
सीट बेल्ट वापराची प्रभावी अंमलबजावणी होणार

सीट बेल्ट वापराची प्रभावी अंमलबजावणी होणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राज्याला चारचाकी वाहनांच्या सीट बेल्टवापरावर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. चारचाकीमधील चालक आणि बाजूच्या आसनासह मागील प्रवाशांनासुद्धा सीट बेल्ट आता अनिवार्य राहणार आहे. मुंबईसह राज्यभरात सीट बेल्ट वापराच्या अंमलबजावणीसाठी परिवहन विभागाच्या प्रादेशिक, उपप्रादेशिक अधिकाऱ्यांकडून आता कारवाई केली जाणार आहे.

चारचाकीमधील अनेक प्रवासी सीट बेल्टवापराच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर केंद्र सरकारने मागील प्रवाशांनादेखील सीट बेल्टच्या कठोर अंमलबजावणीसाठी पावले उचलण्यास सांगितले आहे. वाहनचालकासह पुढील जागेवर बसणाऱ्या व्यक्तीसाठी सुरक्षा पट्टा लावण्याची व्यवस्था केली पाहिजे, मागील सीटवरील सर्व व्यक्तींसाठी सीट बेल्ट लावण्याची व्यवस्था करावी, आसने कव्हर्स हे सुरक्षा पट्टा लावताना अथवा काढताना अडथळा बनू नये, सीट बेल्ट हा वाहनातील अत्यंत आवश्यक घटक असून चालत्या वाहनास अपघात झाल्यास सीट बेल्टमुळे चालक, तसेच प्रवाशास पुढे ढकलण्यास प्रतिबंध होऊन मोठी दुर्घटना टळू शकते. त्याशिवाय योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या वेळी वाहन तपासणी करताना सीट बेल्ट तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.