दिवाळीनिमित्त तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीनिमित्त तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द
दिवाळीनिमित्त तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द

दिवाळीनिमित्त तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : दिवाळीच्या खरेदीसाठी शेवटचा रविवार असल्याने घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने तिन्ही रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यंदा कोरोना महामारीनंतर सर्वच सण उत्साहाने साजरे केले जात आहेत. गणेशोत्सव, नवरात्री आणि दसऱ्यानंतर आता दिवाळी खरेदीसाठी सर्वच बाजारात उत्साहाचे उधाण आले आहे. अवघ्या दोन दिवसांवर दिवाळी आल्याने मुंबईतील बाजारांमध्ये तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी शेवटचा दिवस रविवार आल्याने मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. रेल्वे स्थानकातील अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी आणि मुंबईकरांचा सुविधेसाठी रविवारचा दिवसकालीन ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. गेल्या रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे मेगाहाल झाले. वेळापत्रकातील बदलामुळे निम्म्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची लोकल गर्दी आणि फलाटावर कोंडी झाली होती. मुंबईकरांचे हाल होऊ नयेत, म्हणून रेल्वे प्रशासनाने तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला.