मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडून हुतात्म्यांना श्रद्धांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडून हुतात्म्यांना श्रद्धांजली
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडून हुतात्म्यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडून हुतात्म्यांना श्रद्धांजली

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : मुंबईत पोलिस हुतात्मा दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या एक वर्षात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या २६४ पोलिस कर्मचाऱ्यांना नायगाव येथे श्रद्धांजली वाहिली. कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या पोलिसांच्या बलिदानाची आठवण म्हणून हुतात्मा दिन पाळला जातो. नायगाव येथे पोलिस हुतात्मा दिनानिमित्त झालेल्या परेडमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले होते. गेल्या वर्षी कॉन्स्टेबल दर्जाचे २०२ आणि ६२ अधिकाऱ्यांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाला होता.