मध्य रेल्वेच्या आणखी १० दिवाळी विशेष गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेच्या आणखी १० दिवाळी विशेष गाड्या
मध्य रेल्वेच्या आणखी १० दिवाळी विशेष गाड्या

मध्य रेल्वेच्या आणखी १० दिवाळी विशेष गाड्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : मध्य रेल्वेने दिवाळीनिमित्त आणखी १० अतिरिक्त विशेष एक्स्प्रेस चालविण्याची घोषणा केली आहे. मुंबई-नागपूर ४, नागपूर-पुणे ४ आणि नांदेड-हडपसर २ अशा या एक्स्प्रेस धावणार आहेत. मुंबई ते नागपूर सुपरफास्ट विशेष एक्स्प्रेसच्या ४ फेऱ्या होणार आहेत.

ट्रेन क्र. ०२१०३ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २५ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला रात्री २०.१५ ला सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. ट्रेन क्र. ०२१०४ नागपूर येथून २८ ऑक्टोबर आणि ४ नोव्हेंबरला २०२२ दुपारी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. नागपूर-पुणे दिवाळी विशेष एक्स्प्रेसच्या ४ फेऱ्या होणार आहेत. ट्रेन क्र. ०१४०५ नागपूरहून २६ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबरला दुपारी १.३० वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी पहाटे ६.२५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्र. ०१४०६ एक्स्प्रेस पुण्याहून २७ ऑक्टोबर आणि ३ नोव्हेंबरला सकाळी १०.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ३ वाजता नागपूरला पोहोचेल. ट्रेन क्र. ०७४०३ नांदेड येथून २३ ऑक्टोबरला रात्री ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता हडपसरला पोहोचेल. ट्रेन क्र. ०७४०४ हडपसरहून २४ ऑक्टोबरला सकाळी ११.५० वाजता सुटेल आणि नांदेडला त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता पोहोचेल.