माजी नगरसेवकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी नगरसेवकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
माजी नगरसेवकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

माजी नगरसेवकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि उद्धव ठाकरे गटाचे समर्थक बाळकृष्ण ब्रिद यांच्यावर फसवणूक व अपहाराप्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई महापालिकेची परवानगी नसतानाही ४७ शिलाई मशीनचे बेकायदा वाटप केल्याप्रकरणी ‘आर उत्तर’ प्रभागातील सहायक अभियंता सुशील इंगोले यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रिद हे प्रभाग क्र. एकचे माजी नगरसेवक आहेत.

पालिकेतर्फे ब्रिद यांच्या प्रभागात २०२१-२०२२ मध्ये २०४ गरजूंना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार होते. त्यानुसार १२ मार्च २०२२ रोजी सुमारे ५० मशीन आणि १९ मार्च २०२२ रोजी आणखी ५० मशीनचे वाटप करण्यात आले; परंतु ब्रिद यांनी १५ सप्टेंबर २०२२ रोजी दहिसर येथील केतकीपाडा समाजकल्याण केंद्रामार्फत काही शिलाई मशीनचे वाटप केल्याची माहिती महापालिकेला मिळाली. दुसऱ्या दिवशी तपासणी केली असता, ब्रिद यांनी ४७ मशीन वितरित केल्याचे उघड झाले. नगरसेवकांचा कार्यकाळ यावर्षी ७ मार्चला संपला. प्रशासकामार्फत पालिकेचा कारभार सुरू आहे. त्यानुसार परवानगी नसतानाही ब्रिद यांनी मशीनचे बेकायदा वाटप केल्याचा आरोप पालिकेने केला आहे.