चालत्या दुचाकीवरुन तरुणीचा विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चालत्या दुचाकीवरुन तरुणीचा विनयभंग
चालत्या दुचाकीवरुन तरुणीचा विनयभंग

चालत्या दुचाकीवरुन तरुणीचा विनयभंग

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : स्कुटीवरून मैत्रिणीसह जाणाऱ्या एका तरुणीचा दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुणांनी पाठलाग करत विनयभंग केल्याची घटना गत मंगळवारी पहाटे सीबीडीतील आग्रोळी गाव येथील उड्डाणपुलाखाली घडली. या घटनेतील आरोपी तरुणांविरोधात सीबीडी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
या घटनेतील पीडित तरुणी ही सीबीडी, सेक्टर-१९ मध्ये राहण्यास असून गत सोमवारी रात्री तिच्याकडे मित्र-मैत्रीण आले होते. मध्यरात्री जेवण केल्यानंतर पीडित तरुणी आपल्या दोन मैत्रिणींना सोडण्यासाठी स्कुटीवरून सव्वादोन वाजण्याच्या सुमारास निघाली होती. या वेळी तिचे दोघे मित्र दुचाकीवरून त्यांच्यासोबत जात होते. या वेळी पीडित तरुणीची स्कुटी सीबीडीतील आग्रोळी पुलाखाली आली असताना त्या ठिकाणी आलेल्या अन्य दुचाकीस्वार तरुणांनी शिट्टी वाजवत तरुणींच्या स्कुटीचा पाठलाग केला. त्यानंतर या तरुणांनी स्कुटीवरील तरुणीला चालत्या दुचाकीवरून स्पर्श करून तिची छेडछाड केली. या वेळी तरुणींसोबत दुचाकीवर असलेल्या तरुणांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी तरुणांनी त्यांना दमदाटी करत त्या ठिकाणावरून पलायन केले. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा शोध सुरू केला आहे.