स्टिलच्या किमती घसरल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टिलच्या किमती घसरल्या
स्टिलच्या किमती घसरल्या

स्टिलच्या किमती घसरल्या

sakal_logo
By

नवी दिल्ली, ता. २१ ः दिवळीच्या तोंडावर स्टिलच्या सळईंच्या किमतीत घट झाली आहे. महाराष्ट्रात याची किंमत ५५,१०० रुपये प्रती टन इतकी आहे. सळयांचा वापर इमारतींच्या बांधकामात होतो. सळईची किंमत कमी झाल्याने बांधकामाचा खर्चही कमी होणार आहे.

स्टिलच्या किमती काही काळापासून कमी होत आहेत. गेल्या सहा महिन्यात याच्या किमतीत ४० टक्के घट झाली आहे. याच्या किमती कमी झाल्यामुळे रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रात याचा परिणाम दिसून येईल. जेव्हा स्टिलच्या किमती वाढतात तेव्हा बांधकामाचा खर्च वाढतो. तर स्टिलच्या किमती कमी झाल्यानंतर बांधकामाचा खर्च कमी होतो. एप्रिल २०२२ मध्ये स्टिलची किंमत ७८,८०० रुपये प्रती टन होती. यात १८ टक्के जीएसटी मिसळल्यानंतर याची किंमत ९३ हजार प्रती टन इतकी होत होती. सध्या या किमती घटून सरासरी ५७ हजार प्रती टनवर आल्या आहेत. मुंबईत ही किंमत ५५, १०० रुपये प्रती टन आहे.