रोहित पाटलांच्या सत्तेला धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोहित पाटलांच्या सत्तेला धक्का
रोहित पाटलांच्या सत्तेला धक्का

रोहित पाटलांच्या सत्तेला धक्का

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
कवठेमहांकाळ (सांगली), ता. २१ : कवठेमहांकाळ नगरपरिषदेत भाजपचा नगराध्यक्ष निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पाटील यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांची संख्या समान झाली होती. चिठ्ठी टाकून नगरसेवक निवडण्याच्या प्रक्रियेत भाजपच्या सिंधू गावडे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या राहुल जगताप यांचा पराभव केला.

राष्ट्रवादीच्या नलिनी भोसले, ज्ञानेश्वर भेंडे, अनिता खाडे या नगरसेवकांनी पक्षाच्या विरोधात मतदान केले; तर जयश्री लाटवडे गैरहजर राहिल्या. या चौघांना भाजप खासदार संजय पाटील यांची साथ मिळाल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थकांनी राष्ट्रवादीला समर्थन दिले. राष्ट्रवादी पक्षांतर्गत नाराजी असल्यामुळे याचा फटका त्यांना बसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, खासदार संजय पाटील यांनी रोहित पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मी २५ वर्षांचा होईपर्यंत विरोधकांचे नामोनिशाण ठेवणार नाही, असे विरोधक म्हणाले होते. त्या बालिश विधानाची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे, असे ते म्हणाले.