शाळेत दिवाळीनिमित्त किराणा किट व मिठाईवाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळेत दिवाळीनिमित्त किराणा किट व मिठाईवाटप
शाळेत दिवाळीनिमित्त किराणा किट व मिठाईवाटप

शाळेत दिवाळीनिमित्त किराणा किट व मिठाईवाटप

sakal_logo
By

मालाड, ता. २२ (बातमीदार) ः जोगेश्वरी पूर्व बांद्रेकरवाडी येथील श्रीमती लक्ष्मीबाई वळंजू प्राथमिक शाळेतील १४० विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त किराणा सामान तसेच मिठाई बॉक्स देऊन सहकार्य करण्यात आले. या शाळेत येणारी मुले आरे कॉलनी येथील आदिवासी पाड्यातील असून अभ्यासातदेखील हुशार आहेत. मागील सहा-सात वर्षांपासून जॉय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या शाळेतील प्राथमिक व माध्यमिक अशा दोन्ही विभागात मदत पोहचवली आहे. आमच्या विद्यार्थ्यांना जॉय संस्थेने दिवाळीनिमित्त केलेली मदत खूपच मोलाची असल्याचे मुख्याध्यापिका अर्चना निंबाळकर यांनी सांगितले व जॉय संस्था मागील सहा-सात वर्षांपासून विद्यार्थ्यांना मदत करीत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.